Just another WordPress site

तुम्ही तर काय धुतल्या तांदळासारखे आहात काय?

आमदार राजेंद्र राऊत यांना दिलीप सोपल यांचे ओपन चॅलेंज

बार्शी दि २६ (प्रतिनिधी) – दिलीप सोपल यांना ईडीच्या चौकशीचे आव्हान देणा-याआमदार राजेंद्र राऊत यांना दिलीप सोपल यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे आहात काय? दोघांचीही चाैकशी लावू म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल असे प्रतिआव्हान दिले आहे. त्यामुळे बार्शीचे राजकारण पुन्हा एकदा पेटणार असल्याचे संकेत दिले आहेत.

GIF Advt

दिलीप सोपल यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सोपल म्हणाले की, मागील तीस वर्षे आम्ही विधानसभा सदस्य, कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे. पंचेचाळीस वर्षे सक्रिय राजकारणात आहे. यापूर्वी बार्शी तालुका वाळवंट होता का? तालुक्यात नागरिक नव्हते का? जनता जगायला गेली होती का? पस्तीस दिवसांत विकास पुरुष अवतरले अन् कामाचा धडाका सुरु झाला. वाळवंटात बागायत फुलून गेली. विरोधकाला धांदात खोटे बोलायची सवय आहे उपसा सिंचन योजनेस ५५० कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंजूर केली होती. मी आणि आमदार बबनदादा याचा पाठपुरावा करीत होतो. अर्थमंत्री फडणवीसांनी सुधारीत मान्यता आत्ता दिली आहे.  पण यांना मोठाडं बोलायची सवय आहे. अशा शब्दांत त्यांनी आमदार राऊतांवर तोफ डागली.

बार्शीचे राजकारण कायम सोपल आणि राऊत या दोघांच्या भोवतीच फिरत राहिलेल आहे. काही दिवसापुर्वी सोपल यांनी राऊतांवर आर्यन शुगरच्या मुद्यसवरून ईडी चाैकशीची धमकी दिली होती. त्यामुळे सोपल काय बोलणार याची उत्सुकता होती. पण आता सोपल यांनी प्रत्युत्तर दिल्यावर राऊत काय बोलणार? आणि याचे पडसाद स्थानिक राजकारणात कसे उमटणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!