Latest Marathi News
Ganesh J GIF

पोलिस दलात मोठी खळबळ! अशोक खरात केसमध्ये ‘आयजी’ रडारवर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिकच गडद होत चालले आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाची झळ थेट पोलीस प्रशासनाला बसली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाला नवीन वळण दिले आहे.

 

अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये IG दत्ता कराळे हे अशोक खरातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहेत. दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, दत्ता कराळे हे एक IG लेवलचे पोलीस अधिकारी असताना खरातांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खरातांवर विश्वास का नाही बसणार? त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे. त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल 18 कॉल आहेत. ह्याचे उत्तर पोलिस महासंचालक सदानंद दाते सरांनी घेतले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

यापूर्वी, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये त्या खरातचे पाय धुताना दिसल्या होत्या. या प्रकरणात त्यांच्या बहिणीचीही चौकशी झाली. परिणामी, वाढत्या दबावामुळे चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. आता यानंतर IG दत्ता कराळे यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून अशोक खरात आणि नाशिक पोलिस IG यांच्यात नेमके काय संबंध आहेत, याची आता जोरदार चर्चा होत आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!