Latest Marathi News
Ganesh J GIF

एअर होस्टेसच्या हत्या प्रकरणात ट्विस्ट, पोलिसही स्तब्ध

मुंबईत एअर होस्टेस तरुणीची निर्घुन हत्या, आरोपीने उचलले भलतेच पाऊल, प्रकरणाचा गुंता वाढला

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच मुंबई शहरात तर परिस्थिती फारच भयानक झाली आहे. काही दिवसांपूर्वी अंधेरीत एक एअर होस्टेस तरूणीची हत्या करण्यात आली होती. पण आज हत्या करणाऱ्या आरोपीने तरुंगातच गळफास घेत आत्महत्या केली आहे.

मुंबईतील अंधेरी परिसरातील मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रुपल ओगरे या एअर होस्टेस मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांच्या तपासादरम्यान एअर होस्टेसच्या हत्या प्रकरणात इमारतीमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या कामगाराने ही हत्या केल्याचे समोर आले होते. विक्रम अटवाल असे त्याचे नाव होते. पण आता या प्रकरणात नवीन.ट्विस्ट आला असून अटवाल याने तुरुंगातच पँटच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान रुपलवर अत्याचार करण्याचा त्याचा हेतू होता, मात्र तिने त्याला कडाडून विरोध केल्याने त्याचा प्रयत्न फसला. त्यामुळेच त्याने तिचा खून केला, अश कबुली आरोपीने दिली होती. त्याला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण पुढील सुनावणीआधीच त्याने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात नेण्यात आला असून त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे.

रुपल ओगरे ही एप्रिल महिन्यात एअर इंडियामध्ये नोकरीसाठी मुंबईत आली होती. रुपल तिची बहिण आणि तिच्या बहिणीचा बॉयफ्रेंड यांच्यासोबत राहत होती. मात्र बहिण आणि तिचा बॉयफ्रेंड शहराच्या बाहेर गेले असताना विक्रमने तिची हत्या केली. प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!