Latest Marathi News
Ganesh J GIF

अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मोठा ट्विस्ट

अनिक्षा जयसिंघानीबाबत मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय, कोर्टाने दिले हे निर्देश

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या डिझायनर अनिक्षा जयसिंघाणीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.

अमृता फडणवीस यांच्या तक’ारीवरून मलबार हिल पोलिस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी दाखल गुन्ह्याच्या आधारे शहर पोलिसांनी १६ मार्च रोजी अनिक्षाला अटक केली होती. तिच्यावर १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. अनिक्षा जयसिंघानीला मुंबई सत्र न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. गेल्या सुनावणीत तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी सुनावल्यानंतर तिच्याकडून त्वरित न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन मंजूर करताना तपासात सहकार्य करण्यासाठी अटीशर्ती कोर्टाने अनिक्षाला घातल्या आहेत.या प्रकरणी अमृता फडणवीस यांच्या संपर्कात असल्या तरी अनिक्षा जयसिंघानी यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नव्हता. त्यांचे संबंध कायम चांगले होते. कुठल्यातरी राजकीय हेतूने अनिक्षा यांना या प्रकरणात गोवण्याच प्रयत्न होत असल्याचा युक्तीवाद अनिक्षांच्या वकिलानी कोर्टात केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत कोर्टाने अनिक्षा जयसिंघानी यांना ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. अनिक्षा ही कायद्याची पदवीधर आहे. ती उल्हासनगरची रहिवासी असून, स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा बऱ्याच दिवसांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे.

डिझायनर अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीसांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी दिली असल्याची तक्रार अमृता फडणवीसांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. यानंतर अनिक्षा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!