Latest Marathi News
Ganesh J GIF

‘ऑईल माफिया’ प्रवीण मडीखांबे याच्यासह 8 जण तडीपार

लोणी काळभोर भागातील एका तेल कंपनीच्या आगारातील टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलीस आयुक्त आर. राजा यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले आहे. ‘ऑईल मोफिया’ प्रवीण मडीखांबे याच्यासह आठ जणांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख प्रवीण सिद्राम मडीखांबे (वय 51, रा. संतोषी बिल्डींग, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर), विशाल धानाजी धायगुडे (वय 31), बाळू अरुण चौरे (वय 30, दोघे रा. सिद्राममळा, लोणी काळभोर ), इसाक इस्माईल मचकुरी (वय 42, रा. संभाजीनगर, लोणी काळभोर), संकेत अनिल शेंडगे (वय 39, रा. माऊली‌ अपार्टमेंट, गुजर वस्ती, लोणी काळभोर), राजू तानाजी फावडे (वय 32, रा. कदमावाक वस्ती, लोणी काळभोर), नवनाथ बबन फुले (वय 31, रा. रामदरा रस्ता, लोणी काळभोर), आतिश शशिकांत काकडे (वय 31, रा. कोळपे वस्ती, लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तेल कंपनीचा डेपो आहे.या डेपोतून पेट्रोल-डिझेल टँकरमध्ये भरुन राज्यातील वेगवेगळ्या भागात त्याची विक्रीसाठी पाठवले. मडीखांबे आणि साथीदारांनी टँकर चालकांशी संगनमत करुन तेल चोरीचे गुन्हे केले आहेत. मडीखांबे आणि साथीदारांना लोणी काळभोरसह पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्याकडे पाठवण्यात आला. राजा यांनी मडीखांबे याच्यासह आठ साथीदारांवर तडीपार करण्याचे आदेश दिले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!