भाजपा नेत्या सना खान हत्याकांडाला सेक्स्टॉर्शनचे वळण
सना खान हत्याकांडाला वेगळे वळण, नेत्यांना पदाधिकाऱ्यांना करायचे ब्लॅकमेल, राजकीय भुकंप होणार?
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या नेत्या सना खान यांची हत्या झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सना खानचा तथाकथीत पती अमित साहूला अटक केली. त्याकडून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येप्रकरणात दररोज काही ना काही नवी माहिती समोर येत आहे. आरोपी अमित शाहूने सना खानचा स्वतःच्या राजकीय व आर्थिक लाभासाठी वापर केल्याचे समोर आले आहे. सना खान यांच्याजवळ तीन मोबाईल फोन होते, त्यापैकी दोन पोलिसांना सापडला आहेत. ज्यामध्ये ५० पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याचं समोर आले आहे. यात राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. कारण अमित सना खानला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांकडे शारीरिक संबंधांसाठी पाठवत होता. तर सनाच्या मार्फत त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ मिळवत होते. या व्हिडीओ आणि फोटोंचा धाक दाखवून अमित साहू लाखो रुपये उकळत होता. मागील दोन वर्षात त्यांचे रॅकेट सक्रिय होते. सना अमितकडे या संपत्तीतील काही पैसे मागत असल्याने तिला कायमचे संपविण्याच्या उद्देशातून त्याने तिचा खून करण्याचा कट अमितने रचला होता. दरम्यान अमित साहूच्या मोबाईलमधील क्लिप्स बाहेर आल्या तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधील अनेक मोठ्या नेत्यांची पदं धोक्यात येऊन राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचसंदर्भात नरसिंहपूरचे आमदार संजय शर्मा यांना पोलिसांनी नोटीस दिली होती. त्याचबरोबर मनाचा मृतदेह न सापडल्याने अनेक अर्थ लावले जात आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अमितसह पाच जणांना अटक केली आहे. आणखी नवीन खुलासे त्यांच्याकडून होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस आता आरोपींच्या मोबाईलमधील फोटोंच्या माध्यमातून नागरीकांचा शोध घेऊन त्याची तपास करणार आहे. त्यांनंतर हे संपूर्ण सेक्स्टॉर्शनचं आहे की नाही याचा खुलासा होणार आहे. कारण त्यांच्या खंडणीला बळी पडलेल्या कोणीही पोलीसाकडे तक्रार दाखल केलेली नाही.
दोन वर्षांपुर्वी सना खानची ओळख फेसबुकवर कुख्यात गुंड अमित साहूशी झाली होती. पुढे त्यांच्यात नेहमी भेट होत राहिली. त्यातूनच अमित साहू आणि सना खान यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर सना खान आणि अमित साहूने लग्न केले. पण नंतर मात्र त्यांच्यात वाद होऊ लागल्याने अमितने सनाचा खून करत तिचा मृतदेह नदीत फेकण्यात आला.