Latest Marathi News
Ganesh J GIF

नवऱ्याची निवड न झाल्याने पत्नी संतापली म्हणाली…

विनम्र असणे तुमच्या विकासात आड येतं का? म्हणत व्यक्त केला संताप, सोशल मीडिया पोस्टद्वारे सवाल?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- बीसीसीआयने काल आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने १७ सदस्यीय संघ जाहीर केला. रोहित शर्मा हा टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. या टीममध्ये फिरकीपटू युझवेंद्र चहल याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असताना आता बीसीसीआयवर जोरदार टिका करण्यात आली आहे. तसेच अन्य निवडीवर आक्षेप घेण्यात येत आहे.

फिरकीपटू यजुवेंद्र चहलला संघात स्थान न दिल्यामुळे चहलची पत्नी धनश्री वर्मा संतप्त झाली आहे. धनश्रीने इंस्टाग्रामवर स्टोरीद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मी आता याबाबत गंभीरतेने प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. फार विनम्र आणि अंतर्मुख असणं हे तुमच्या विकासात आड येतं का? तसेच जीवनात पुढे जाण्यासाठी एक्सट्रोवर्ट आणि प्रमाणापेक्षा समजदार असणं गरजेचं आहे का?”, असा शब्दात धनश्रीने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान स्पर्धेसाढी निवडलेल्या संघात ३ फिरकी गोलंदाजांना स्थान मिळाले असून, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्याशिवाय अक्षर पटेलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अक्षरला संघात स्थान देण्याचे कारण म्हणजे तो चांगली फलंदाजी करू शकतो, असे निवडकर्त्यांचे म्हणणे आहे. पण त्याचवेळी धनश्रीने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे चहलसोबत अन्याय झालाय का, अशी चर्चा सुरु झाली आहे. आशिया कपसाठी चहलला डावललं गेल्यामुळे आता वर्ल्ड कपसाठीही त्याची निवड होणं मुश्कील मानलं जात आहे. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही चहलला संधी मिळाली नव्हती. महत्वाचे म्हणजे स्पर्धेसाठी नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या टीममध्ये लेग स्पिनर आहेत, पण भारताने एकाही लेग स्पिनरला संधी दिलेली नाही. चहलला संधी न दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर इरफान पठाण याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!