Latest Marathi News
Ganesh J GIF

ही नामर्दानी! केंद्र सरकार कधी कधी नामर्दासारखे वागते

शिंदे गटातील आमदाराची आपल्याच सरकारवर जोरदार टिका, मोदींना सुनावत दिला आंदोलनाचा इशारा

पुणे दि २३(प्रतिनिधी)- देशात आणि राज्यात कांद्यावरुन चांगलेच राजकारण रंगले आहे. कांदा निर्यात शुल्कावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असमन्वत दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिल झाला आहे. त्यामुळे सरकारवर सगळीकडून टिका होताना दिसत आहे. सरकारविरोधात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे.

कांदा प्रश्नावर बच्चू कडू पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना कडू यांनी आपल्याच सरकारवर टिका केली आहे. त्यामुळे सरकारमधील आमदारच नाखुश असल्याचे समोर आले आहे. कडू म्हणाले, शेतकऱ्यांना २०० रुपये प्रतिक्विंटल तुम्ही पैसे द्याचे आणि शेतकऱ्यांचे १०० क्विंटलमागे नुकसान करायचे. लोकांनी कांदा नाही, खाल्ला तर मरणार आहेत का? कांदा न खाल्ल्याने कोणी मेले का? एक तरी उदाहरण आहे का? असा सवाल उपस्थित केला. पण याच वेळी त्यांनी केंद्र सरकारवर टिका केली ते म्हणाले, “केंद्र नामर्दासारखे वागते कधी कधी.ही नामर्दानी आहे. फक्त सत्ता ठिकावी म्हणून ग्राहकाचा विचार केला. खाण्याचा विचार केला. पिकवणाऱ्याचा विचार का? केले नाही. ही नालायक प्रवृत्ती सरकारने सुधरली पाहिजे. मी जरी सत्ते असेल, शेतकऱ्यांच्या बाजून हे वक्तव्य मला करावेच लागेल. हे माझे कर्तव्य आहे. भाव वाढले म्हणून हस्तक्षेप करता. भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप का करत नाही?”, असा उलट सवाल बच्चू कडूने सरकारला केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडले. तुम्ही ऐवढे भीता का? मेक इन इडियांचे धोरण अवलंबत असताना निर्यातीवर कर वाढविता. शेतकऱ्यांच्या कांद्याला परदेशात सफरचंदाचा भाव येईल ना आणि कांदा नाही खाल्ला तर कोणी मरत नाही, ऐवढी काळजी करायची गरज नाही.” असे सुनावले आहे. तसेच कांद्याएैवजी लसून खा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्याने सध्या केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यातच आता बच्चू कडू यांनी देखील सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत जोरदार टिका केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!