Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपा खासदाराची मशिदीत घुसून मुस्लीमांना धक्काबुक्की

अजान बंद पाडण्याचा प्रयत्न, व्हिडिओ समोर आल्याने खळबळ, अटक होणार?

पुणे – पुण्यातील भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शेख सलाहुद्दीन दर्गा ट्रस्टकडून करण्यात आला आहे.

मेधा कुलकर्णी यांनी आजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी या वेळी जवळच असलेल्या ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्याचा प्रयत्न केलाअसा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या संदर्भातला एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. रविवार दिनांक हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेघा कुलकर्णी यांनी या वेळी जवळच असलेल्या एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्यासाठी ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यातील मस्जिदीत अजान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांना मेधा कुलकर्णी यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.यासंदर्भात ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टकडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा व त्याद्वारे वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रकार असल्याची टिका राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर राहुल डंबाळे यांनी केली आहे.

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आणलेलं आहे. मेधा कुलकर्णी यांना अटक करा अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीकडून करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!