Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपा खासदाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टिका

शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांच्यावरही साधला निशाना, बघा नेमके प्रकरण काय

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे फडवणीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरी असले तरीही भाजपाचे आमदारही मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका करत आहेत. त्यामुळे शिंदे नामधारी मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतो आणि भाजपा खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टिका केली आहे. एकप्रकारे यातून शिंदे फडणवीस सरकारमध्ये आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर तिला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. यावरुन भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले “मी महाराष्ट्र विधानसभेत होतो, तेव्हापासून प्रयत्नशील असायचो, या तिघांनाही शिवछत्रपती पुरस्कार मिळालेत, त्यांनी घर मागितलं तर सरकार देत नाही, कबड्डीपटूंमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीची मुलगी होती, तिला सुवर्णपदक मिळालं, तर तिला एक कोटी देण्यात आले, ही कोणती पद्धत? एखाद्या कबड्डीपटूची ओळख मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी नाही तर त्याला काहीही देऊ नये. ही कोणती व्यवस्था आहे? असा प्रश्न गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेत, त्यांना पूर्वीच्या काळी फ्लॅट दिले होते. तेव्हा जर तीनशे फुटांचं घर होतं, आता ५०० फुटांची जागा द्या, काय फरक पडतो? अशी मागणीही खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. एकप्रकारे या सरकारमध्ये भाजपाचीच चलती असेल असा सुचक इशारा यातुन देण्यात आला आहे.

कोणा मुलाची ओळख मंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशी असेल, तरच त्यांना पारितोषिक मिळणार? अशी एक गाईडलाईन बनवा असे म्हणत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!