Just another WordPress site

नगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा

नेत्यांच्या वादात कार्यकर्ते भिडले, स्थानिक कार्यकर्त्यांमुळे युतीला धोका

अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. एका लग्नसमारंभ हा राडा झाला. यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांचा स्थानिक पातळीवरील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

GIF Advt

भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले केडगावमधील एका लग्नसमारंभासाठी गेला होता. त्यावेळी तिथे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचाही मुलगा आला होता. एकमेकांकडे पाहण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या अक्षय कर्डीलेने कार्यकर्त्यांसह दिलीप सातपुते यांच्या मुलाच्या केडगावमधील हॉटेल रंगोलीवर तुफान दगडफेक केली, त्याला उत्तर देत सातपुते यांच्या समर्थकांनीही कर्डीलेंच्या समर्थकांवर दगडफेक केली.या दगडफेकीत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ग्राहक आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलीस तपास सुरु आहे. या राड्यामुळे शिंदे गट आणि भाजप नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अहमदनगरमधील केडगावमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घेत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या या प्रकरणातील हस्तक्षेपानंतर सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. राडा आणि दगडफेकीच्या घटनेनंतर परिसरातील स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रीत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!