Latest Marathi News

भाजप नेत्याची महिला पोलीस अधिकारीला शिविगाळ

घटनेचा व्हिडिओ व्हायरल, भाजप नेत्याचा पोलिसांवर आरोप, राजकारण तापले

ओडीसा दि १६(प्रतिनिधी)- केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या राज्यसस्तरावरील नेत्यांकडून अनेकदा सरकारी अधिकारी, पोलीस यांच्याबरोबर वाद घालण्याचे प्रकार समोर आले आहेत आता पुन्हा एकदा ओडीसामधील भाजप नेत्याचा महिला पोलीसाबरोबर हुज्जत घालत शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

ओडिशाचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा आमदार जयनारायण मिश्रा यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याने वाद निर्माण झाला आहे. संबलपूर येथे भाजपाने एका आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी जयनारायण मिश्रा यांनी धक्काबुक्की तसेच शिवीगाळ केल्याचा महिला पोलीस अधिकाऱ्याने केला आहे, तर आपल्याला महिला पोलीसाचे धक्का दिल्याचा दावा मिश्रा यांनी केला आहे. अनिता प्रधान असे महिला पोलीस अधिकारीचे नाव आहे. प्रधान आणि आपल्यावर लाचखोरीचा आरोप करत चेहऱ्यावर हात लावत मागे ढकलले असा आरोप प्रधान यांनी केला आहे. तर जयनारायण मिश्रा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलीस महिला कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचं ऐकून मी पुढे गेलो होतो असा त्यांचा दावा आहे. या प्रकाराचा एक व्हिडीओ देखील समोर आला असुन त्यात प्रधान आणि मिश्रा वाद घालत असल्याचे दिसत आहे.

या घटनेनंतर ओडीसात राजकारण सुरु झाले असून बीजेडी आणि भाजप आमनेसामने आले आहेत. भाजपाने एक महिला अधिकारी विरोधी पक्षनेत्याला शिवीगाळ करत आहे. ओडिशात कोणतीही कायदा-सुव्यवस्था नाही. असा आरोप केला आहे तर बीजेडीने मिश्रा यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून लोकांना धमकावणे, छळ करण्यासाठी ते ओळखले जातात असा प्रति आरोप केला आहे. दरम्यान संभलपूरचे पोलीस अधिक्षक बी गंगाधर यांनी याप्रकरणी चाैकशीचे आदेश दिले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!