Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यात भाजपाला धक्का बसणार? ओपीनियन पोल समोर

ओपिनियन पोलनुसार धक्कादायक आकडेवारी समोर, पक्षात जोरदार लढत, पहा कोणाला किती जागा?

भोपाळ दि १(प्रतिनिधी)- देशातील लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. पण त्याआधी तीन राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातील मध्यप्रदेश निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आता मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कुणाची सत्ता येईल यासंदर्भातील दोन ओपिनियन पोल जाहीर झाले आहेत.

मध्य प्रदेश हे देशातील महत्त्वाचं राज्य आहे. राज्यात येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. एका ओपिनियन पोलमध्ये काँग्रेस तर दुसऱ्या ओपिनियन पोलमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते असा अंदाज आहे. टाइम्स नाऊ आणि न्यूज २४ आणि पीईएसीएस मीडिया यांनी काही अंदाज वर्तवले आहेत. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीनं केलेल्या सर्व्हेनुसार काँग्रेसला २३० जागांपैकी ११८ ते १२८ जागा मिळतील. तर भाजपला १०२ ते ११० जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे न्यूज २४ आणि पीईएसीएस मीडियाच्या अंदाजानुसार
भाजपला ११५ ते १२२ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला १०५ ते ११५ जागा मिळू शकतात. एकंदरीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्त्वात भाजपची सत्ता सध्या मध्य प्रदेशात आहे. पण भाजपाने यावेळेस अनेक खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना यावेळेस विधानसभेचे तिकिट दिले आहे. पण महत्वाचे म्हणजे अद्याप शिवराज चाैहान यांना अद्याप तिकीट जाहीर झालेले नाही. दुसरीकडे ज्या भागातून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली होती तिथं काँग्रेसला फायदा होण्याची चिन्हे आहेत.

राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊ- नवभारत आणि ईटीजीने प्रसिद्ध केलेल्या या सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण २०० जागांपैकी भाजपला ९५ ते १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काॅंग्रेसला ९१ ते १०१ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांच्या खात्यात ३ ते ६ जागा जाऊ शकतात असा अंदाज आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!