Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजप महिला नेत्याची नोकराच्या मदतीने पतीने केली हत्या?

हत्येचे धक्कादायक कारण समोर, एकजण पोलीसांच्या ताब्यात, मृतदेह शोधण्यात पोलीस अद्याप अपयशी

नागपूर दि ११(प्रतिनिधी)- भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या महिला आघाडी अध्यक्ष सना खान यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. जबलपूर येथील पप्पू ऊर्फ अमित शाहू याच्यासोबत सोनसाखळीवरून वाद झाल्यानंतर त्या गायब झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह मध्यप्रदेशातील नदीत फेकण्यात आल्याचे समोर आले होते. अशातच नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातील जबलपूर येथून सना खानचा मित्र अमित साहू याच्या नोकरास अटक केली आहे. त्यानंतर धक्कादायक खुलासे होत आहेत.

नागपूर येथील भाजपच्या महिला पदाधिकारी सना खान या १ ऑगस्टला मध्यप्रदेशातील आपला मित्र अमित साहूला  भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेंव्हापासून त्या गायब होत्या. पण २ तारखेला सना खानचा नंबर लागत नसल्यामुळे तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार सना खान आणि अमित शाहू यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद सुरु होते. तसेच पप्पूने सना यांना १ तारखेला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी सना यांच्या गळ्यात पप्पूला सोनसाखळी दिसली नाही. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सना जबलपूरला गेल्या होत्या. आईच्या तक्रारीनंतर नागपूर पोलीसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने महिला पदाधिकाऱ्यासह अमित साहू आणि त्याचा भाऊ मनीष यांचा शोध घेतला. तिघांचाही काहीच सुगावा लागलेला नव्हता. पण तपासादरम्यान पोलिसांना त्यांचा नोकर जितेंद्र गौडवर संशय आला. त्याला अटक केली असता, त्याने सनाची हत्या करून मृतदेह हीरन नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. शाहूने सना खान यांची घरातच हत्या केली. त्यानंतर सना खान यांचा मृतदेह डिक्कीमध्ये ठेवून जबलपूर-दमुआ-कटंगी रस्त्यावरील ढाब्यापासून काही अंतरावर असलेल्या हिरण नदीत फेकून दिला. त्यावेळी नदीला पूर आला असल्याने पोलिसांना सना खान यांचा मृतदेह आढळून आला नाही. दरम्यान हत्येला आता दहा दिवस झाल्यानंतर देखील मृतदेह सापडलेला नाही. अमित उर्फ पप्पू हा फरार झाला असून त्याने ढाब्यालाही कुलूप लावले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पण सना यांचा मृतदेह सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सना खान यांनी कुख्यात अमित ऊर्फ पप्पू याच्यासोबत सहा महिन्यांपूर्वी लग्न केले होते. एक मॅरेज सर्टिफिकेट सोशल मीडियावर वायरल होत आहे. त्यानुसार, सना व संशयित आरोपी अमित उर्फ पप्पू शाहू याने २४ एप्रिल २०२३ रोजी जबलपूरमध्ये लग्न केले होते. दरम्यान हिरन नदीच्या काठावरून पोलिसांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. जबलपूर पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एक पथक गठित केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!