Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजप नेत्याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या

भाजपा नेत्याच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, हत्येनंतर परिसरात खळबळ, दोनजण ताब्यात

लखनऊ दि ११(प्रतिनिधी)- नागपूरमधील भाजपा महिला नेत्याची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशात भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुरादाबादमध्ये भाजपा नेते अनुज चौधरी यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून खून केला आहे. अनुज चौधरी हे भाजप किसान मोर्चाशी संबंधित होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

भाजपा नेते अनुज चौधरी हे पाकबाडा येथील अपार्टमेंटमध्ये राहत होते. ते गुरुवारी आपल्या घराजवळील उद्यानात फिरायला गेले होते. यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. अनुज चौधरींनी विद्यमान ब्लॉक प्रमुखांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्या कारणामुळे चौधरी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर त्यांना सुरक्षाही पुरवण्यात आली होती. अचानक झालेल्या गोळीबारामुळे बेसावध असलेल्या अनुज चौधरी यांच्या वर्मी गोळी लागल्याने ते जागीच कोसळले. मारेकऱ्यांनी गोळीबार करुन घटनास्थळावरुन पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे.

चौधरी यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चौधरी आणि अनिकेत या दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेच्या तपासासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!