Latest Marathi News
Ganesh J GIF

कल्याणमध्ये उपचारासाठी गेलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू

मूल होत नसल्यामुळे सुरु होते उपचार, हाॅस्पीटलचे स्पष्टीकरण, पुजासोबत काय घडले?

कल्याण दि ११(प्रतिनिधी)- मूल होत नसल्याने हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी एका खासगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कल्याणच्या अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर नातेवाईक चांगलेच संतप्त झालेले पहायला मिळाले. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पूजा लोखंडे असे मृत महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी इथे राहणाऱ्या पूजा लोखंडे यांना मूल होत नसल्याने उपचारासाठी त्या कल्याणमधील आपल्या माहेरी आल्या होत्या. अॅपेक्स रुग्णालयात उपचार सुरु होते. घटनेच्या दिवशी त्यांची हिस्ट्रोलेप्रोस्कोपी होणार होती. पण हिस्ट्रोलेप्रोस्कोपी सुरु असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि तासाभरात त्यांचा मृत्यू झाला.  पूजा यांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. पण अखेर पोलीसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

रुग्णालयातील डॉ मानसी घोसाळकर यांनी मात्र पूजा लोखंडे यांचे आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिलेवर हिस्ट्रोलेप्रोस्कोपी सुरु होती. याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण समोर येईल असे त्या म्हणाल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!