Latest Marathi News
Ganesh J GIF

त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची हवा, मेघालयात त्रिशंकू

नागालॅंडमध्ये चालली पवार, आणि आठवलेंची जादू, पहा तीन राज्याचा निकाल

दिल्ली दि २(प्रतिनिधी)- ईशान्य भारतातली त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला आहे. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मेघालयात सत्ताधारी नॅशनल पिपल्स पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तिथे कोणालाही बहुमत मिळाले नाही.

भाजपाने त्रिपुरा आणि नागालँडमध्ये आपली सत्ता राखली आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणूक :- ६० जागांच्या त्रिपुरा विधानसभेत भाजप-३२, आयपीएफटी-१, सीपीआय (एम)-११, काँग्रेस-४, त्रिपुरा मोथा पार्टी-१२ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाला या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नागालॅंडमध्ये भाजप-एनडीपीपीने (नेशनल डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी) ३७ जागा जिंकत सत्ता प्राप्त केली आहे.नागालॅंडमध्ये कॉग्रेसला खातं देखील उघडता आले नाही आहे. तर एनपीफने २, राष्ट्रवादी ७ आणि इतर पक्षानी १४ जागा जिंकल्या आहेत.
मेघालयात मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एनपीपीने (नेशनल पीपल्स पार्टी) सर्वाधिक २६ जागा जिंकल्या आहेत.त्यानंतर इतर पक्षांनी २५ जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर कॉग्रेस ५ आणि भाजपच्या ३ जागांवर जिंकला आहे. इथे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

या तीन राज्याच्या निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे नागालँडमध्ये प्रथमच महिला आमदार निवडून आल्या आहेत .हेकानी जाखलू या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन आमदार निवडून आले आहेत. पहिल्यांदाच राज्याबाहेर आठवले गटाचे आमदार निवडून आले आहेत.तर नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागा लढल्या होत्या. त्या पैकी सात जागांवर विजय मिळवला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!