Latest Marathi News

अनैतिक संबंधाच्या आरोपामुळे जात पंचायतीने सुनावली अग्निपरिक्षा

जात पंचायतच्या विचित्र निकाला चर्चेत, भयंकर शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल

तेलंगाणा दि १ (प्रतिनिधी)- आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही जात पंचायती अस्तित्वात आहेत.या जात पंचायतींकडून देण्यात येणाऱ्या काही विचित्र निकालांमुळे त्या कायमच चर्चेत असतात. तेलंगाणात जात पंचायतीने सुनावलेला एक शिक्षा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

तेलंगणात एका व्यक्तीवर भावाच्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यावेळी हे प्रकरण जात पंचायतीसमोर चर्चेला आले. त्यावेळी जात पंचायतीने त्या व्यक्तीला आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्या करता धगधगत्या कोळश्यात ठेवलेली विस्तवात ठेवलेली लोखंडाची सळई बाहेर काढण्याचा आदेश देण्यात आला.त्या व्यक्तीनेही आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याकरता विस्तवाच्या ढिगाऱ्याच्या मध्यभागी ठेवलेली आणि तापून लाल झालेली लोखंडाची सळई हाताने उचलून बाहेर फेकली. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

देशातील ग्रामीण भागांमध्ये पंचायतींचे निकाल हे अंतिम समजले जातात. व्हिडिओत मुलुग गावातील गावकरीही या तरुणाला कोळश्यातून तापलेली सळई बाहेर काढण्यास सांगत आहेत. पण हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!