Latest Marathi News

कॉलेज आवारात चाकूने भोसकून तरुणीची हत्या

आरोपी तरुणाने स्वतःवरही केले वार, पोलीस तपासातुन धक्कादायक खुलासा

बेंगळूरू दि ४(प्रतिनिधी)- कर्नाटक राज्यातील बेंगळूरूमध्ये एका १९ वर्षीय तरुणीची कॉलेज परिसरात चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर ली आहे. ही घटना सोमवारी प्रेसीडेंसी कॉलेजच्या परिसरात घडली. लेस्मिथा असे मृत तरुणीचे नाव असून ती बीटेकचे शिक्षण घेत होती. हल्लेखोर तरूणाने स्वतः वरही हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणीने आरोपी तरुणाच्या प्रेमाला नकार दिल्याने तरुणाने हे कृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कॉलेजचे सुरक्षा रक्षक तरुणीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेस्मिथाला पवन कल्याण याने वर्गाबाहेर बोलवले त्यानंतर १० ते १५ मिनिटे दोघांमध्ये बोलणे झाले. त्यानंतर आरोपी पवनने बॅगेतून चाकू काढला आणि लेस्मिथावर वार केला. त्यानंतर त्याने स्वत:वर देखील चाकूने वार केले. लेस्मीथाची हत्या केल्यानंतर आरोपी पवन याने स्वत:वर देखील चाकूने वार केले.

आरोपी तरुण आणि मृत तरुणी कोलार जिल्ह्यातील मुलबगल गावाशेजारील काछीपूरा येथील रहिवासी आहेत.आरोपी पवन जवळच्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिस त्याची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. पण या हल्ल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!