Latest Marathi News

मराठी अभिनेत्रीच्या मराठमोळ्या रुपाची बाॅलीवूडला भुरळ

इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, तुम्हीही पडाल मराठी रूपाच्या प्रेमात

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- मराठी अभिनेत्रींमध्ये सध्या प्राजक्ता माळीचा सगळीकडे बोलबाला आहे. प्राजक्ता माळी हिने नुकताच एक ब्रँड लाँच केला आहे. ‘प्राजक्तराज’ नावाने तिने इमिटेशन ज्वेलरीचं उत्पादन सुरु केले आहे. त्याबद्दल सोनु सुदने तिचे काैतुक केले आहे.

प्राजक्तराजच्या खास कलेक्शनमध्ये सोने व चांदीचे दागिने आहेत. तर आपल्या याच ब्रॅण्डचे दागिने घालून प्राजक्ता ब्रह्मपुरी महोत्सावाच्या उद्घाटन सोहळ्याला गेली. यावेळी तिने सुंदर हिरवीकंच साडी आणि गळ्यात प्राजक्तराजची वज्रटिक घातली होती. या गळ्यातल्या हारानं सोनू सूदचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताने एका पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. “ब्रम्हपुरी महोत्सव.”प्राजक्तराज” विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं की मी भारावून गेले. खूप आभार. ठरवून टाकलं.’प्राजक्तराज’चं पहिलं प्रदर्शन विदर्भात लागणार.”भद्रावती”. By the way.सोनू सूद ही म्हणाले, “गळ्यातलं unique आहे..” अर्थातच ‘प्राजक्ताराज’ची ‘वज्रटिक’ परिधान केली होती..”, अशी पोस्ट तिने केली आहे. प्राजक्ता माळीने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिचे सोनू सूदबरोबरचे फोटो व्हायरल होत आहेत. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे 

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन खळबळ माजवली असते. ती आपल्या कामामुळे आणि लूक्समुळे चर्चेत असते. तिचे हटके फोटो कायमच चर्चेत असतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!