Latest Marathi News
Ganesh J GIF

शरद पवारांच्या जवळच्या खासदाराचे लोकसभेतून निलंबन

अधिवेशनापुर्वीच राष्ट्रवादीला धक्का, राष्ट्रवादीचे लोकसभा संख्याबळ घटले

दिल्ली दि १४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत कालच एका खासदाराला दहा वर्षाची शिक्षा झालेली घटना मागे पडत असतानाच पक्षाला आणखी एका धक्का बसला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्षद्वीप येथील कावारत्ती न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांना आता लोकसभा सदस्य पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे.

लोकसभा सचिवालयाने १३ जानेवारी रोजी उशिरा रात्री मोहम्मद फैजल यांना लोकसभा सदस्यपदावरून अपात्र ठरविल्याची अधिसूचना जारी केली. फैजल यांना कावारत्ती येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून म्हणजेच ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्य पदावरून अपात्र ठरवले आहे. त्यामुळे ते आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकत नाहीत. फैजल हे महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८ सह भारतीय राज्यघटनेच्या कलम १०२ (l) (e) च्या तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला.फैजल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर लक्षद्वीप येथून निवडून आले होते. हा निर्णय राष्ट्रवादीला धक्का असणार आहे.

लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना लक्षद्वीपमधील कावारत्ती सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालीह यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. खासदार फैजल आणि इतरांनी माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालीह यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्यावर एका निर्यात प्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!