Latest Marathi News
Ganesh J GIF

‘ब्राह्मण भारताचे नसून रशियाचे त्यांना इथून पळवून लावा’

माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, डीएनए चाचणीचाही दिला संदर्भ, जोरदार टिका

पटना दि ३(प्रतिनिधी)- बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार यदुवंश कुमार यादव एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यादव यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मणांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

बिहारमध्ये सध्या जातीनिहाय जनगणनेची जोरदार चर्चा चालू आहे. बिहारप्रमाणेच देशभरात या जनगणनेचे राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. यदुवंश कुमार यादव यांनी बिहारच्या सुपौल भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर शनिवारी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. ब्राह्मण हे मूळचे भारतीय नाहीच, असा दावा त्यांनी केला असून त्यासाठी डीएनए चाचणीचाही संदर्भ त्यांनी दिला आहे. ते म्हणाले, ‘आपल्या सर्वांमध्ये फूट पाडण्याचे आणि आपापसात भांडण लावण्याचे काम फक्त ब्राह्मण करत आहेत. ते आपल्यामध्ये फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला त्यांना येथून हाकलवून द्यावे लागेल’. असे यदुवंशकुमार यादव म्हणाले आहेत. तसेच  ‘एकही ब्राह्मण भारताचा नाही, त्यांच्या डीएनएद्वारे हे उघड झाले आहे. हे सर्वजण रशिया आणि इतर देशांतून आले आहेत, त्यांना त्यावेळी तेथून हद्दपार करण्यात आले होते आणि त्यानंतर ते सर्वजण भारतात आले आहेत.’ असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

राजद नेत्याच्या या विधानानंतर आता त्यांचाच सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या संयुक्त जनता दलाकडून टीका करण्यात आली आहे. जदयुचे प्रवक्ते अभिषेक कुमार झा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “राजदच्या नेत्यांनी केलेलं विधान वादग्रस्त आहे. परशुराम रशियातून आले होते की इतर कोणत्या देशातून? फक्त चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी अशी विधानं केली जात आहेत. राजदनं अशा नेत्यांविरोधात कारवाई करायला हवी”, असं अभिषेक कुमार झा म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!