
बुलेटवर नवरदेवाला सोबत घेत नवरीची लग्न मंडपात सैराट एंट्री
नवरीच्या हटके ए्ंट्रीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, मुलगी आणि बापाच्या नात्याची होतेय चर्चा
पुणे दि ११(प्रतिनिधी)- आजकाल लग्न हा केवळ आनंदाचा सोहळा राहिलेला नाही तर त्यातही हटके काहीतरी करण्याचा नवरदेव नवरीचा प्रयत्न असतो. पण लग्न मंडपात आपल्या नवरदेवाला थेट बुलेटवर मागे बसवून स्वतः बुलेट चालवत आलेली नवरी चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील नवरी सोशल मिडीयावर चांगलीच हिट झाली आहे. तिचा बुलेट राईडचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
सणसवाडी येथे शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील नवरदेव नवरीचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. पण हा विवाह सोहळा चर्चेत आला तो नवरीने लग्नमंडपात घेतलेल्या हटके एंट्रीमुळे. या ठिकाणी लग्नासाठी वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाला नवरीने थेट बुलेटवर बसून लग्नमंडपात घेऊन गेली. नवरीने नवरदेवाला बुलेटवर मागे बसून लग्नमंडपात घेतलेली ही एंट्री सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मुलीला सर्व वाहने चालवता येत असल्याने शेतकरी बापाने लेकीची हौस पुर्ण करत तिला लग्नात भेट म्हणून एक कार, एक बुलेट आणि दुचाकी दिली. शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नाची हौस पूर्ण केली. त्यातच नवरीची ही हटके एंट्री या लग्न सोहळ्याचं खास आकर्षण ठरली. या लग्न सोहळ्याची पंचक्रोशित चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे नवरीने मराठमोळा साज शृंगारही केला होता. आणि ‘या’ नादखुळया सोहळ्यात संपूर्ण वऱ्हाडी मंडळी नवरीला त्या रूपात पाहून अवाक् झाली. या डेरिंगबाज नवरीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नाची हौस पूर्ण केली असून मुलगी आणि बापाच्या नात्याला यामुळे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. त्याशिवाय आजच्या आधुनिक युगात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मान देण्यात आला आहे. तसेच ज्या घरात मुलगी जन्माला आली. त्या घरात तिचे स्वागत केले जात आहे.