
‘दस-याला पन्नास खोक्याच्या खोकासुराचे दहन करा’
उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर घणाणात, भाजपावरही डागली तोफ
मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघात केला. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करताना स्वतःचा मुलगा खासदार आणि नाताला नगरसेवक बनवण्याचे स्वप्न कोण पाहत असा सवाक करत आजच्या दसरा मेळव्यात ५० खोके घेणाऱ्या खोकासुराचे दहन करा असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले
शिवतीर्थावर शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा पार पडला यावेळी त्यांनी शिंदे गटाबरोबर भाजपावर देखील जोरदार टिका केली. भाषण करण्याअगोदर त्यांनी शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. ठाकरे म्हणाले की, डाॅक्टरांनी मला वाकायला मनाई केली आहे. पण तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. म्हणून मी नतमस्तक होतोय भाजपा सांगतय की आम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचे ठरले नव्हते पण मी आज शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की भाजपाने आपला शब्द न पाळल्यामुळेच मी महाविकास आघाडीची स्थापना केली. पण शिवसेनेला संपवायला निघालेल्यांच्या मांडीला मांडी लावून बाप पळवणारी टोळी जाऊन बसली आहे. मी हिंदुत्व सोडले अस म्हणणाऱ्यांनी जिनाच्या कबरीवर कुणी डोके ठेवले, नवाज शरीफला केक कोणी खाऊ घातला याचे उत्तर देण्याचे आव्हान ठाकरेंनी केले आहे. आज देशात महागाई बेरोजगारी असताना हे लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी जयश्री रामचा नारा दिला जातो पण जयश्री राम प्रत्येक हाताला काम असे म्हणत ठाकरे यांनी संघाच्या होसबाळे यांच्या विधानाचा दाखला दिला. रूपयांचे अवमुल्यन होत असताना तुम्ही सरकार पाडापाडीत व्यस्त आहेत असे म्हणत भाजपवर टिका केली.
त्याचबरोबर हिंदुत्व म्हणजे काय यावर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले.यावेळी नड्डा यांच्या विधानाचा दाखला देत देश हुकूमशाहीकडे चाललाय की अशी भीती ठाकरेंनी व्यक्त केली. यापुढचा खडतर काळ मी लढणार आहे तुमची साथ द्या असे आवाहन करताना ठाकरे यांनी रावणाचे पन्नास खोकेच्या रावणाचे दहन केले