Latest Marathi News
Ganesh J GIF

या प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेत्री विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवर केला घोटाळा, अभिनेत्रीबरोबर या व्यक्तीवरही गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अलिकडे सेलिब्रेटी व्यक्तींकडून इतरांना फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. मध्यंतरी बालकलाकार साईशा भोईरची आई पूजा भोईला आर्थिक फसवणुक प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. आता बाॅलीवूड अभिनेत्री सोनारीका भदोरिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री सोनारिका भदौरिया हिनं इन्स्टाग्रावर गुंतवणुकीसंदर्भात काही पोस्ट शेअर केल्या होत्या. तिने इशिका जयस्वाल या महिलेच्या इन्स्टाग्राम पेजवर जाऊन पैशांची गुंतवणूक करा आणि मोठे रिटर्न्स मिळवा, अशी जाहिरात केली होती. ही जाहीरात पाहून परमेश मैत्री नामक व्यक्तीने पैशांची गुंतवणुक केली. परंतु नंतर आपली फसवणुक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. म्हणुन त्याने पोलिस ठाण्यात अभिनेत्रीविरोधात तक्रार करुन गुन्हा नोंदवला आहे. शाहू नगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अभिनेत्री सोनारिका भदोरिया आणि इशिका जैस्वाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना कुठल्याही ऑनलाइन ट्रेडिंग किंवा सेलिब्रिटी ॲड पाहून पैशाचे व्यवहार करू नये, असे आवाहन केले आहे. सोनारिका भदोरिया  ही सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फाॅलोअर्स आहेत.

सोनारिका भदौरिया हिनं अनेक हिंदी, तमिळ अशा सिनेमांमध्ये तसंच मालिकांमध्ये काम केलं आहे. पण देवों के देव…महादेव या मालिकेतून तिला विशेष लोकप्रियता मिळाली. तिचे इन्स्टाग्रामवर १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!