Latest Marathi News
Ganesh J GIF

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण; भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, धक्कादायक माहिती समोर.

पूजेच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केल्याचा आरोप.
खडकपाडा पोलिसांनी शाहिद शेखला एका तासात अटक केली.
आरोपीवर POCSO आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ७८ वर्षीय भोंदू बाबा शहिद शेख याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?
दैनंदिन जीवनात रोजच्या भोंदूबाबाच्या कारनाम्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. नाशिकच्या अशोक खारत नंतर अनेक भोंदूबाबाचे कारनामे समोर आले. आता असाच एक प्रकार कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यातून समोर आला आहे. एक महिला वर्षभरापासून कल्याण पश्चिम भागात वास्तव्यास आहे. यापूर्वी ती आपल्या कुटुंबासोबत उल्हासनगर येथे राहत होती. तिची सासू आणि पतीचे निधन झाले होते. त्यांनतर ओळखीतील एका व्यक्तीने त्यांच्या घरात बाधा असल्याचे भोंदूबाबाला सांगितले. बाधा दूर करून घरात शांतता नांदावी यासाठी पूजा करण्याचा सल्ला देण्यात आला.

याच पूजेच्या नावाखाली शाहिद शेखने २ मे रोजी महिलेच्या १५ वर्षीय मुलीला समोर बसवून पूजा केली. ६ मे रोजी पुन्हा तो घरी आला. त्यावेळी मुलीची आई घरात नसतांना पूजेच्या बहाण्याने आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानांतर महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी एका तासाच्या आत शाहिद शेखला अटक केली. पोलिसांनी त्याच्या विरुधात एनएस 64, (2i) 64( 2m ) 65 (1), पोस्को एक्ट 4, 8, 12 आणि जादूटोणा अॅक्ट 3 (1), 3 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.भोंदूगिरीच्या नावाखाली आरोपीने आणखी किती महिला किंवा मुलींना फसवले आहे,याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!