नव्या मंत्रिमंडळातील ‘एवढ्या’ मंत्र्यावर आहेत गुन्हे दाखल
राज्यातील नवीन मंत्र्यांची सगळी माहिती वाचा
मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर ३९ दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळटचा विस्तार पार पडला. आता शिंदे सरकारमध्ये २० मंत्री आहेत. मात्र, शिंदे सरकारमधील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. तर काही 8 मंत्री केवळ इयत्ता १० वी किंवा १२ वी पर्यंतच शिकलेल आहेत. पाहूया राज्यातील मंत्र्याबद्दल आणखी माहिती
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात ही माहिती दिली आहे. राज्यातील ७५ टक्के मंत्र्यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. या मंत्र्यांनीच ही माहिती आपल्या निवडणूक शपथपत्रात दिली आहे.असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नवीन मंत्र्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून त्यातून निष्कर्ष काढण्यात आले आहेत. नव्या १५ मंत्र्यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. त्यातील १३ मंत्र्यांच्या विरोधातील गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. महत्वाचे म्हणजे शिंदे सरकारमधील सर्व मंत्री करोडपती आहेत. शिंदे सरकारमधील ८ मंत्री १० वी किंवा १२ वी शिकले आहेत.तर ११ मंत्र्यांनी पदवीपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेलं आहे. एका मंत्र्याकडे डिप्लोमा आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरीही खातेवाटप झालेले नाही पण ते अधिवेशनाच्या आधी होण्याची शक्यता आहे. महत्वाच्या खात्यावरुन दोन्हीकडून वाटाघाटी करण्यात येत आहेत त्यामुळे एक दोन दिवसात कोणाला कोणते खाते याचे चित्र स्पष्ट होणार आहे.