पतीला दुस-या महिलेसोबत पकडत पत्नीने चपलीने बदडले
पतीला चपलीने बडवण्याचा व्हिडीओ व्हायरल, 'त्या' महिलेलाही चोप
आग्रा दि २२(प्रतिनिधी)- पती पत्नीच्या नात्यातील प्रेम कोणा एकाकडून जरी कमी झाल्यास विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. अशावेळी संवाद गरजेचा असतो.मात्र काही महाभाग आपले कारनामे चालूच ठेवतात. अशाच एका नव-याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल हो आहे. एका पत्नीने आपल्या पतीला हाॅटेलवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडत धुलाई केली आहे. ही धुलाई चांगलीच व्हायरल होत आहे
व्हायरल होत असलेली घटना आग्रामधील एका हॉटेलमधील आहे. एक पती आपल्या बायकोच्या नकळत दुस-याच महिलेला डेट करत होता. पत्नीला या गोष्टींची शंका आल्याने तिने पतीवर नजर ठेवण्यास सुरु केली. एके दिवशी तिला घेऊन तो हॉटेलच्या रूममध्ये गेला होता. पण बायकोने त्याचा पाठलाग करून त्याला रंगहात पकडले. तिला समोर पाहताच त्याला धक्का बसला. त्याने थेट हात जोडत माफी मागायला सुरूवात केली.पण बायको संतापल्याने काही ऐकण्याचे नाव घेत नव्हती. तिने आपल्या पायातील चप्पल काढत नवऱ्याला मारहाण केली. यावेळी तिने त्या दुस-या महिलेचीही धुलाई केली आहे. पत्नीने पतीला सुनावत चांगलीच धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विवाहबाह्य संबंध पकडल्याचे अनेक व्हिडिओ या आधीही व्हायरल झाले आहेत. अशावेळी पत्नीचा रुद्रावतर पतींना पहावा लागतो. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भडकले आहेत. त्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.