Latest Marathi News
Ganesh J GIF

शालेय साहित्य वाटप करत दहिटणेत स्वातंत्र्यदिन साजरा

विकास घडमोडे यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदले, स्वराज्य संघटनेचाही सहभाग

बार्शी दि १५ (प्रतिनिधी)- आज सा-या देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दहिटणे येथे स्वातंत्र्यदिनाचे अवचित्य साधत विकास घडमोडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप केले आहे. दरवर्षी ते साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत असतात.

दहिटणे गावाला स्वातंत्र्याचा वारसा लाभलेला आहे स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली दहिटणेकरांनी लढा उभा केला होता. त्याच दहिटणे गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साह दिसून येत होता. प्रभात फेरी, कवायत मुलांची देशभक्तीपर गीते, भाषणे यांनी पूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. विकास घडमोडे दरवर्षी त्यांचे दिवंगत वडील मल्लिकार्जुन घडमोडे आणि दिवंगत बंधू साईनाथ घडमोडे यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्याचे वाटप करत असतात यावर्षी त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणित पाटी आणि रंगीत पेन्सिल बाॅक्सचे वाटप केले. यावेळी स्वराज्य संघटनेच्या वतीनेही शालेय साहित्य वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे शालेय साहित्य भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विकास घडमोडे यांच्या या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी काैतुक करत आभार मानले आहेत. घडमोडे यांनीही आगामी काळात हा उपक्रम राहवत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहनदेखील करण्यात आले यावेळी सरपंच महानंदा घोंगाने, माजी सरपंच कृष्णात काशीद, ग्रामपंचायत सदस्य सागर काशीद, शाळा समिती अध्यक्ष संजय काशीद,मुख्याध्यापक आळगड्डे,शिक्षक गणेचारी, शिक्षिका दळवी, पालवे, विकास घडमोडे, बसवेश्वर घडमोडे,स्वराज्य संघटनेचे पदाधिकारीसह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!