Latest Marathi News
Ganesh J GIF

चंद्रकांत पाटील यांच्या मुलीच्या पॅनलचा भाजपाकडून पराभव

मुलगी जिंकली पण पॅनेलच पराभूत, भाजपानेच चारली पराभवाची धुळ

जामनेर दि २०(प्रतिनिधी)- गुजरातमध्ये भाजपच्या अभूतपूर्व विजयाचे शिल्पकार ठरलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मुलीच्या पॅनलचा जळगावातील जामनेरमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळं सीआर पाटील यांना महाराष्ट्रात राजकीय धक्का बसला आहे. त्यांची मुलगी भाविनी पाटील यांचा मोहाडी ग्रामपंचायतच्या सदस्यपदी विजयी झाल्या मात्र, त्यांच्या पॅनलचा धक्कादायक पराभव झाला आहे.

जळगावमधल्या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाविनी पाटील यांनी आपलं ग्राम विकास पॅनल उभं केलं होतं. या निवडणुकीत भाविनी पाटील यांच्या पॅनलला १० पैकी ३ जागा मिळाल्या. तर भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या, त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटीलांच्या पॅनलला मिळालं आहे. विशेष म्हणजे शरद पाटील हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. भाजपाच्याच दोन गटात सामना झाला.मोहाडी हे भाविनी पाटील यांचं सासर आहे, गेल्या वेळी भाविनी पाटील मोहाडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. पण यंदा सरपंचपद महिला एसटी वर्गासाठी राखीव असल्याने भाविनी पाटील यांनी सदस्यपदाही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदस्य म्हणून भाविनी पाटील विजयी झाल्या, पण त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला यश मिळवता आलं नाही. विशेष म्हणजे भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, पण निकालात त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.

चंद्रकांत पाटील हे मूळचे जळगावमधील रहिवासी होते. मात्र, १९८९ ते गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. पण त्यानंरही त्यांचा महाराष्ट्राशी संबंध कायम आहे. त्यांचे बरेचसे नातेवाईक खान्देशात आहेत. त्यामुळे जळगावमध्ये त्यांचं कायम जाणं-येणं असतं. शिवाय त्यांच्या कन्या भाविनी पाटील यांचा विवाह मोहाडीतील रामभाऊ पाटील यांच्याशी झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!