Latest Marathi News
Ganesh J GIF

… म्हणुन दारुड्या नव-याची बायकोने केली धुलाई

नव-याने ब्युटी पार्लरमध्ये येऊन केले असे कृत्य, धुलाईचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेच्या दारुड्या नवऱ्याने पार्लरमध्ये येऊन धिंगाणा घालणाऱ्या पतीची त्याच्या पत्नीने चांगलीच धुलाई केली आहे. या धुलाईचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यावर अनेक कमेंट आल्या आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला व तिच्या नवऱ्याचा कशावरून तरी वाद होती. पण त्यानंतर ती महिला आपल्या ब्युटी पार्लरवरुन काम करत बसते. पण तिचा नवरा दारु पिऊन येतो आणितिथे राडा करु लागतो. तसेच तिला घरी चल असे म्हणत धमकावू लागतो. यावर त्या महिलेने त्याला शांत राहण्यास सांगितलं तसेच मी माझे काम करत आहे, तू इथून निघून जा असे सांगितले.यावर चिडून तिच्या पतीने चक्क ग्राहक महिलेचे केस धरून ओढायला सुरुवात केली. हे बघताच त्याच्या पत्नीने नव-याच्या गळ्याला धरत चांगलीच धुलाई केली. पत्नीने नव-याची केलेली धुलाई ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे.

महिला मुळात शांत स्वभावाच्या असल्या तरीही महिलेच्या सहनशीलतेला सुद्धा काही सीमा असतात. जेंव्हा त्यांची सहनशीलता संपते तेंव्हा त्या दुर्गेचे रुप धारण करतात. त्यामुळे त्रास देणाऱ्या नव-याची बायकोने केलेली धुलाई पाहुन इतर पतींनी बोध गरज आहे. अशा कमेंट व्हायरल झाल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!