Latest Marathi News
Ganesh J GIF

चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतदान तारखेत बदल

पोटनिवडणूकीसाठी या तारखेला होणार मतदान, निवडणूक आयोगाचे पत्रक जारी

पुणे दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात भाजपाच्या दोन आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अगोदर २७ फेब्रुवारीला मतदान होणार होते.पण निवडणूक आयोगाने आता मतदानाची तारीख बदलली आहे.

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने काही दिवसांपूर्वी केली होती. या निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यातच निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण घोषणा करत कसबापेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. दोन जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचं जाहीर केले होते. त्यानंतर २ मार्चला मतमोजणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील १२वीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच दिवशी येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आयोगाने मतदानाच्या तारखांमध्ये बदल करत मतदानाची तारीख २७ फेब्रुवारी एैवजी २६ फेब्रुवारी केली आहे. दरम्यान आयोगाच्या पत्रकानुसार ४ मार्चपूर्वी मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.


कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध केली जावी, यासंदर्भात राजकीय चर्चा करण्यात येत आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होताना दिसत नाही. महाविकास आघाडी आणि भाजपाकडुन निवडणूक लढवण्याची चाचपणी करण्यात येत आहे. पण दोन्ही बाजूंनी उमेदवारांची घोषणा अद्याप केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!