Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेसचे सत्यजित तांबे यांचा भाजपात प्रवेश?

भाजपाची खेळी काँग्रेसच्या जिव्हारी, थोरातांपुढे धर्म संकट

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षात लवकरच पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे. विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक पदवीधरमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले सत्यजित तांबे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे थोरात यांच्या अडचणी वाढणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होत आहेत. सत्यजीत यांना भाजपचा पाठिंबा हवा असल्यास, भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आपली ताकद सत्यजीत यांच्या पाठीशी उभी करत आहे. त्यामुळे त्याचा लवकरच भाजप प्रवेश होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने नाशिक मतदार संघात उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांना पक्षात घेऊन त्यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. पण सत्यजित तांबे भाजपात गेल्यास बाळासाहेब थोरात यांची अडचण होणार आहे. त्यामुळे मामा भाचा संघर्ष होणार आहे.

अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ”अशा चांगल्या माणसांना मोकळे ठेवू नका… नाहीतर आमचा डोळा राहतो, चांगले नेते भाजपला हवे आहेत, असे म्हटले होते. तो शब्द आता खरा ठरत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!