‘लवकर पाचशेच्या नोटा शंभर अन् दोनशेत बदलून घ्या’
लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात पुन्हा एकदा नोटबंदी?, निवडणुकीपुर्वी मोठ्या घडामोडी घडणार?
धुळे दि २७(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली आणलेल्या नोटबंदीला लवकरच सात वर्ष पुर्ण होणार आहेत. तसेच नुकताच रिजर्व बँकेनेही दोन हजाराच्या नोटा बंद केल्या आहेत. पण आता लवकरच पाचशेच्याही नोट बंद होतील अशी शक्यता देशातील बड्या नेत्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. ते म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा नोटबंदी होईल. त्यामुळे ज्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी ते पैसे शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांमध्ये त्या कन्व्हर्ट करून घ्याव्यात. एवढचं नाही तर आंबेडकर यांनी दंगल होण्याची भीती व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे पॅलेस्टाईन मध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. तशाच प्रकारे भारतात देखील घमासान युद्ध येणाऱ्या काळात आरएसएस व भाजप जाती-जातीच्या आरक्षणाच्या नावावर लावण्याची शक्यता असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केली. त्यामुळे हे घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. यावेळी आंबेडकर यांनी मोदीवर जोरदार निशाना साधला. केवळ चमकोगिरी केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अन्य कोणतेही काम नाही. त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये देशातील जनतेने त्यांना घरी पाठवावे. भाजपा स्वत:ला हिंदूंचे सरकार म्हणते. मात्र वर्षभरात एक लाख तेरा हजार हिंदुंनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. अशी टिका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
भाजप हे कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा डाव वेळीच ओळखावा. मराठा समाज देखील आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. याचा गैरफायदा घेत आरएसएस आणि भाजपा मिळून धनगर आणि कोळी समाजाचा आदिवासींशी संघर्ष पेटवून दिला आहे. असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.