काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर चव्हाण यांचे मोठे वक्तव्य
काँग्रेसच्या सद्यस्थितीवर व्यक्त केली चिंता, निवडणुकीवर हे विधान
सातारा दि १५ (प्रतिनिधी)- मी कॉंग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे माहित नाही. पण मी कॉंग्रेसच्या विचारात आहे. आम्हाला भीती आहे की लोकशाही धोक्यात आहे. कॉंग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा. अशी मागणी ऑगस्ट २०२० मध्ये केली होती. सोनिया गांधी यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानत पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. माझी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
पृथ्वीराज चव्हाण हे पक्षाच्या ध्येय धोरणबाबत मागील काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस मधून बाहेर पडलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली होती. त्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. कॉंग्रेसच्या अध्याक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होत आहे. कोरोनामुळे अध्यक्षांचा थेट संवाद होत नव्हता. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली नाही. यामुळे अध्यक्षांना पत्र लिहीलं होतं. ते पत्र फोडलं. कॉंग्रेसचा अध्यक्ष थेट नेमनुकीमूळ होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी, अशी आमची मागणी होती. ती आता मान्य झाली.असे चव्हाण म्हणाले
महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी वेदांता प्रकल्प गुजरातला पळवला. आज जे डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात चालले आहे, त्यांची किंमत राज्याला मोजावी लागत आहे. पंतप्रधान मोदींनी गैर पद्धतीने हस्तक्षेप करून कंपनीवर दबाव आणून हा प्रकल्प गुजरातमध्ये नेला, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.