Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवारांसमोरच ‘या’ मोठ्या नेत्याची राष्ट्रवादीवर नाराजी

भाषण सुरु असताना बत्ती गुल झाल्याने रंगली वेगळीच चर्चा,श्रेष्ठी दखल घेणार?

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातल्या एका कार्यक्रमात जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवारांसमोरच जिल्ह्यातील पक्षाच्या धोरणावर जाहीर नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घरीच असतात, पण कार्यक्रमांना बोलावलं जात नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. पण यावेळी बत्ती गुल झाल्याने वेगळीच चर्चा रंगली होती.

एकनाथ खडसे यांनी २०२० साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.यावर्षी त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती.त्यांना मोठे मंत्रिपद मिळेल, अशी शक्यताही वर्तवली जात होती,पण शिंदेच्या बंडामुळे सरकार कोसळ्याने ती संधी हुकली.पण आता आपल्याच पक्षाच्या धोरणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. खडसे म्हणाले की, नाथाभाऊचा गट वेगळा, इतरांचा गट वेगळा, अशी स्थिती राहिली तर पुढील काळात अवस्था बिकट राहील, ओके म्हणून खोके म्हणून चालणार नाही, पक्षाने आक्रमक व्हायला पाहिजे,जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घरीच असतात. हे पक्षाच्या हिताचे नाही असा इशाराच त्यांनी दिला. पण त्यांचे भाषण चालु असताना लाईट गेल्याने ती गेली होती का घालवली होती.अशी चर्चा रंगली होती. थेट अजित पवार यांच्यासमोरच आपली नाराजी व्यक्त केल्यामुळे पक्षश्रेष्ठी याची दखल घेणार की सध्याच्या पदाधिकाऱ्यांनाच झुकते माप देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपातील मानापमान नाट्यानंतर एकनाथ खेडे यांनी दोन वर्षापूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण आता तिथेही त्यांनी पक्षाच्या धोरणावर जाहिर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे दोन वर्षातच नाराजीचे सुर आळवणारे खडसे राष्ट्रबादीतच राहणार की वेगळा मार्ग शोधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!