Latest Marathi News
Ganesh J GIF

आयपीएलमधील चिअरलिडर्स एका सामन्यात करतात ‘एवढी’ कमाई

आयपीएलमध्ये चिअरलिडर्सचे यंदा पुनरागमन, पहा चिअरलिडर्स आणि क्रिकेटचे नाते

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- आयपीएलच्या १६ व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची नेहमीच चर्चा असते. यसवर्षी मागील काही सीझनमध्ये नसणाऱ्या गोष्टी यावर्षी पुन्हा आल्या आहेत. यामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअरलीडर्सही आयपीएलमध्ये परतल्या आहेत. त्यांच्याविषयी अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते.

आयपीएलमध्ये प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट घेताच आपल्या लयबद्ध नृत्याचा अविष्कार दाखवत चिअरप करणाऱ्या चिअर लिडर्सही आपल्या डोळ्यासमोर येतात. या चिअरलिडर्सचा इतिहास पहायचा झाल्यास साधारण 1898 मध्ये अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या एका फुटबॉल टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा चिअर लिडर्स दिसल्या होत्या. भारतातील लोकांना यांचे पहिले दर्शन २००७ च्या टी २० वल्डकपमध्ये झाले होते. आयपीएल सुरु झाल्यानंतर चिअरलिडर्सवरुन सुरूवातीला बराच वाद रंगला होता.पण आता तो प्रकार स्थिर झाला आहे. या चिअरलिडर्सच्या कमाईविषयी अनेकांना कुतुहल असते. जर याची माहिती पाहिल्यास आयपीएलसाठी चीअर लीडर्सबरोबर करार केला जातो. हा करार संपूर्ण स्पर्धेसाठीचा असतो. चेन्नई, पंजाब, हैदराबाद, दिल्ली या संघाकडून चीअरलीडर्संना सामन्यागणिक १२ हजार रुपये दिले जातात. तर राजस्थानकडून १४ ते १५ हजार रुपये दिले जातात. मुंबई आणि आरसीबी या संघाकडून त्यांना २० हजार रुपये दिले जातात. केकेआर संघाकडून सर्वाधिक म्हणजे २४ हजार रुपये दिले जातात. हे वेतन एका सामन्यासाठीचे असते. त्याचबरोबर एखादा संघ जिंकला तर त्यांना बोनसही दिला जातो. याशिवाय एखादा संघ फायनलपर्यंत पोहोचला वेगळा बोनस दिला जातो. या चिअरलिडर्स अतिशय काटेकोर नियम पाळून आलेल्या असतात. आयपीएल चीअरलीडरला डान्स, मॉडेलिंग आणि गर्दीसमोर परफॉर्म करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय चीअर लीडर्सला आपले शरीर लवचीक ठेवावे लागते. त्यामुळे प्रत्येक षटकार आणि चाैकारानंतर नाचणाऱ्या चिअरलिडर्स अनेकांच्या आकर्षणाचे कारण असतात.

चिअरलिडर्स आणि क्रिकेटपटु यांचे सुत देखील जुळल्याचे दिसून आले आहे. एकेकाळी कोलकाता नाईट राईडर्ससाठी चिअर लिडरचं काम करणारी हसीन जहाँ आघाडीचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीसोबत विवाहबध्द झाली होती. पण नंतर त्यांच्यात वाद झाले. पण कधी कधी चिअरलिडर्सकडे धनदांडग्या व्यक्तींकडून शरीर सुखाचीदेखील मागणी केली जाते. त्यामुळे अश्लील शेरेबाजीचाही सामना त्यांना करावा लागतो.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!