Latest Marathi News
Ganesh J GIF

आपल्या देशातील आजवरच्या पंतप्रधानांचे शिक्षण काय?

जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी पहा सर्वांचे शिक्षण, पंतप्रधानपदासाठी किती हवे शिक्षण?

दिल्ली दि ८(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधानांची पदवी बनावट असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर भाजपाकडून मोदींच्या पदवीचे प्रमाणपत्र दाखवण्यात येत आहे. पण आपल्या देशात आजवरचे जे पंतप्रधान पदी होते त्यांचे शिक्षण काय होते असे कुतुहल अनेकांच्या मनात आहे त्याचीच माहिती जाणून घेऊया.

आजवर भारताला १३ पंतप्रधान लाभले आहेत तर क्रमानुसार प्रत्येकाचे शिक्षण जाणून घेऊया

१. जवाहरलाल नेहरू-देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते हॅरोत गेले. त्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून Natural Science या विषयाचं शिक्षण घेतलं. त्यांनी इनर टेम्पल इनमधून कायद्यावे शिक्षण घेतले होते.

२. लाल बहादूर शास्री- लाल बहादूर शास्त्री गांधींच्या आवाहनानंतर वाराणसीतल्या सरकारी शाळेतून बाहेर पडले होते. पुढे वाराणसीच्या काशी विद्यापीठानं शास्त्रींना पदवी प्रदान केली होती.

३. इंदिरा गांधी – इंदिरा गांधी यांनी स्वित्झर्लंडमधील इकोल नॉवेल, जिनिवातील इकोल इंटरनॅशनल, पुण्यातील प्युपिल्स ओन स्कूल, ब्रिस्टलमधील बॅडमिंटन स्कूल, विश्वभारती, शांतीनिकेतन आणि ऑक्सफोर्डमधील सोमरवेल कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. कोलम्बिया विद्यापीठाकडून त्यांचा डिस्टिंक्शनबद्दल सन्मानही करण्यात आला होता.

४. मोरारजी देसाई- मोरारजी देसाई यांचे शालेय शिक्षण सेंट बुसार हाय स्कूलमधून झाले होते. मुंबई प्रांतातून १९१८ साली त्यांनी विल्सन सिव्हिल सर्विसमधून पदवी प्राप्त केली होती.

५. चरणसिंह- चरणसिंह यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली होती. त्याचबरोबर आग्रा विद्यापीठातून १९२५ साली त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. दिवाणी खटल्यांचे वकील म्हणून त्यांनी काही कसळ प्रॅक्टिसही केली होती.

६. राजीव गांधी- राजीव गांधी यांचे शालेय शिक्षण वेलहेम बॉयज स्कूल आणि डून स्कूलमध्ये पार पडले होते. केम्ब्रिजचे ट्रिनिटी कॉलेज आणि लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली होती. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाही कोर्स केला होता.

७. चंद्रशेखर – चंद्रशेखर यांनी सतीशचंद्र पी जी कॉलेज येथे त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी मिळविली. १९५० मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.

८. पी. व्ही. नरसिंहराव- नरसिंहराव यांचे शालेय शिक्षण कतकुरू गावात झाले, तर उस्मानिया विद्यापीठाकडून त्यांना बॅचलर्स ऑफ आर्ट्स डिग्री देण्यात आली होती. हिसलॉप कॉलेजमधून त्यांनी त्यांचं कायद्याचं शिक्षण पूर्ण केले होते.

९. व्ही. पी. सिंह- व्ही. पी. सिंह यांनी पूना युनिव्हर्सिटी आणि अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होते.

१०. इंद्रकुमार गुजराल- गुजराल यांनी बीकॉम आणि नंतर एमएचं शिक्षण पूर्ण झाले होते त्यांनी पुढे पीएचडीही पूर्ण केली होती. त्यांना मानद डी. लीट प्रदान करण्यात आली होती.

११. एच. डी. देवेगौडा- देवेगाैडा यांनी हसनच्या एलव्ही पॉलिटेक्निक कॉलेजमधून सिव्हिली इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले होते.

१२. अटलबिहारी वाजपेयी- वाजपेयी यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत ग्वालियरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती. तसेच कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयाचे एमएचे शिक्षणही पूर्ण केले होते.

१३. मनमोहन सिंग – मनमोहन सिंग यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पंजाब विद्यापीठात झाले होते. त्यानंतर त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या न्यूफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्राची डिग्री घेतली. त्यानंतर अर्थशास्त्रातच डी. फिलचं शिक्षणही त्यांनी पूर्ण केले होते.

१४. नरेंद्र मोदी- मोदी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या माध्यमातून राज्यशास्त्र विषयात पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर गुजरात विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्सचं शिक्षण पूर्ण केले.
नरेंद्र मोदी यांनी २०१४ देशाचे १४वे पंतप्रधान झाले. त्यांच्या शिक्षणासंदर्भात सध्या वाद सुरू आहे. यासंदर्भात आप पक्ष पहिल्यापासून आग्रही आहे.

राज्यघटनेनुसार खासदारच आपल्यातील एका नेत्याची पंतप्रधान म्हणून निवड करत असतात. त्यामुळे त्या पदासाठी विशिष्ट असे पात्रता नियम घटनेत नाहीत. परिणामी एखाद्या खासदारासाठी असणारी पात्रताच पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होते. शिक्षणाच्या कोणत्याही अटीचा उल्लेख राज्यघटनेत करण्यात आलेला नाही.

(टीप- पंतप्रधानांच्या शिक्षणाची माहिती इंटरनेटवरील विविध माहितीच्या देण्यात आली आहे. त्यामुळे यात बदल होऊ शकतात.)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!