Just another WordPress site

‘छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली’

भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान, सत्ताधारी विरोधक आमनेसामने

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांनी वीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या दावा केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. पण आता एका भाजपा नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी ओैरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती असा दावा केल्याने पुन्हा एकदा राज्यात राजकारण पेटले आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागतली होती, ते ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते, असे विधान राहुल गांधींनी केले होते.त्यांच्या विधानानंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. पण आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबला पत्र लिहिले होते. त्या काळात राजकीय अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक लोक माफीनामे लिहायचे असे विधान त्रिवेदी यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं.त्या कार्यक्रमात त्रिवेदी यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

GIF Advt

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सकाळी शिवाजी महाराज हे जुन्या काळाचे आदर्श, अताचे आदर्श गडकरी असे विधान केले होते. त्यावरुन अनेकांनी राज्यपालांवर टिका केली. तर राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलण्याची मागणी देखील करण्यात आली होती. पण आता भाजप प्रवक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!