Just another WordPress site

घटस्फोटाच्या चर्चांवर ही प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली

अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, घटस्फोट होणार?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- अभिनेत्री मानसी नाईक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मानसीने पती प्रदीप खरेराशी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा आहेत. हे दोघे लवकरच विभक्त होणार असे समोर आले आहे. अभिनेत्री किंवा तिचा नवरा प्रदीप खरेरा यांच्याकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र मानसीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे दोघांमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. तीची ही पोस्ट भलतीच चर्चेत आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत पोस्ट करताना दिसत आहे. मानसीने केलेल्या पोस्टमध्ये “आपल्या आयुष्यात अनेक मित्र येतात जे तुमच्यासाठी सतत खंबीरपणे उभे राहत असतात. तुम्ही जे जसे आहात, तसे ते तुम्हाला स्वीकारतात आणि त्याबद्दल त्यांच्या मनात तुमच्याविषयीच आदरच असतो. ते तुमच्यासाठी लढतात. तुम्हाला सहभागी करुन घेतात. तुम्हाला प्रोत्साहन देतात. काहीही झालं तरी ते तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहतात.पण माझ्या आयुष्यात अशी काही माणसं अपवादाने आली की ज्यांनी मित्राचा बुरखा घेतलेला होता मात्र त्यांनी वरीलपैकी कोणतीही गोष्ट केली नाही. असे म्हणत आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलबेल नसल्याचे सांगितले आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीचे तिच्या खासगी आयुष्याशी आणि घटस्फोटाशी संबंध जोडला जात आहे. मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होते.

GIF Advt

मानसी नाईकने ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेद्वारे टेलिव्हिजन विश्वात विशेष लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तिनं विविध चित्रपट, रिॲलिटी शोमध्ये काम केले. पण ती तिच्या ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांमुळे विशेष चर्चेत आली आहे. ती सध्या तिच्या ‘एकदम कडक’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!