मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला सर्व आमदार – खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार
शिवसेनेतील फुटीनंतर पहिलाच अयोध्या दाैरा, दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार व खासदार हे ६ एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याच्या या अयोध्या दौऱ्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही दिवसापुर्वीच महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी अयोध्येमध्ये भेट देऊन आले होते.
शिवसेनेत बंडखोरीच्या पुर्वी एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. अयोध्या दौऱ्यावर जाताना खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनाही घेऊन जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा अयोध्या दौरा राजकीय रणनितीचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. या विषयी बोलताना भरत गोगावले म्हणाले की, “धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर प्रभू रामाचं दर्शन घ्यायचं असं ठरलं होतं. धनुष्यबाण मिळाल्यानंतर साहेबांचा काही नवस असू शकतो तोही फेडू. अयोध्येला जायचं ठरलं होतं. तिकडे जात आहोत. साहेब जे बोलत होते. त्या गोष्टी पूर्ण होत आहेत. म्हणून आम्ही जात आहोत, असं गोगावले यांनी सांगितले आहे. अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. आता पुन्हा अयोध्या दौऱ्याचा विषय चर्चेत आला आहे. तोही एकनाथ शिंदे यांच्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्यानं या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरयू नदीकाठी धार्मिक विधींमध्ये भाग घेणार आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत जावून रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले आहेत. काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथील प्रसिद्ध असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिराला भेट दिली होती. यावेळी सर्व आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.