Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपच्या स्टेजवर बायकांचा डान्समुळे चित्रा वाघ अडचणीत

बायका नाचवल्या खासदाराने निशान्यावर चित्रा वाघ, बघा नक्की प्रकरण काय?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मॉ़डेल उर्फी जावेद हिच्या पेहरावावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. पण आता या वादात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेऊन चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले आहे. त्याचबरोबर भाजपाच्या संस्कृतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली आहे. पण आता अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ ट्विट करून चित्रा वाघ यांना सवाल केला आहे. प्रिय चित्राताई वाघ, भाजपच्या श्री रमेश बिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का? असे दमानिया म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर वाघ यांचा राजकारणात कमबॅक करण्याचा किंवा स्व:तचं अस्तित्व निर्माण करण्याचा किंवा मंत्रीपद मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता, अशी टीकाही दमानिया यांनी केली आहे.

राजस्थानच्या अलवरमध्ये भाजपची जन आक्रोश महासभा पार पडली. या सभेत काही महिलांना नाचवण्यात आले होते. त्यामुळे दमानिया यांनी राजस्थानमध्ये जनआक्रोश महासभा घेण्यात आली. त्यात तरुणी नाचत होत्या. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? असा सवाल वाघ यांना विचारला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!