Latest Marathi News

मराठीतील ही आघाडीची अभिनेत्री करणार लवकरच लग्न?

व्हायरल व्हिडिओनी वाढवली उत्सुकता, बघा नेमक काय आहे त्या व्हिडिओत

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. प्राजक्ताच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. नुकताच प्राजक्ताला एका ज्योतिषाने पुढच्या वर्षी लग्न होणार असल्याचे होते. प्राजक्ता आता तिच्या चाहत्यांसाठी खास सरप्राईज घेऊन आली आहे.


गुरुच्या कृपेमुळे प्राजक्ताच्या लग्नाचे योग दिसत आहेत असे सांगण्यात आले होते. आणि आता प्राजक्ताने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने चाह्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पायात पैंजण घालून पायऱ्या उतरताना दिसत आहे.त्यामुळे प्राजक्ता कोणासोबत लग्न करणार? कधी करणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. पण प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये त्या व्हिडिओचा खुलासा केला आहे. ती म्हणाली “नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही. त्यासाठी “वाट बघा”. इन्स्टा लाइव्हवर उद्या ५.३० वाजता भेटूया. नक्की या.” प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

प्राजक्ता लवकरच तिचा ज्वेलरी ब्रँड लाँच करणार आहे अशी चर्चा आहे.पण सध्यातरी तिने याबाबत कोणतीच माहिती दिली नाही. तू तुझा ज्वेलरी ब्रँड सुरू करत आहेस, प्राजक्तराज ज्वेलरी ब्रँड सुरू करणार आहेस अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी तिचा व्हिडीओ पाहून केल्या आहेत. पण ती लग्न करणार नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!