भर कार्यक्रमात आमदार आणि खासदार यांच्यात जोरदार राडा
सोशल मिडीयावर राड्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल, श्रेयवादाचे राजकारण हातघाईवर, पक्षातील वाद कारणीभूत
रांची दि १९(प्रतिनिधी)- लोकांसाठी कल्याणकारी योजना आणणे, त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी आमदार आणि खासदार यांनी एकत्र काम करणे अपेक्षित असते. पण झारखंडमध्ये मात्र सत्ताधारी पक्ष आणि विरोधक त्यांच्यात जुंपली आहे. साहिबगंजतील एकाच पक्षाचे खासदार आणि आमदार यांच्यात रस्त्यातच जोरदार हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे. याची जोरदार चर्चा रंगली आहे.
बाबा साहिबगंजच्या तीन पहारच्या बाकुंडीची असून रस्त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात जेएमएम आमदार लोबीन हेम्ब्रम आणि खासदार विजय हासदा यांनी ही हाणामारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खासदार विजय हासदा यांच्या हस्ते एका ठिकाणी रस्त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम होत होता. आमदार लोबीन हेम्ब्रम यांना या पायाभरणीचे आमंत्रण देण्यात आले नव्हते. तरीही ते तेथे आले होते. आणि आपल्याला आमत्रंण न देण्याचे कारण विचारत संताप व्यक्त केला. त्यावर खासदार देखील संतापले. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणीच दोघांनी हाणामारी करायला सुरुवात केली. या दोघांमधील भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघात रस्त्याची पायाभरणी होत असेल तर त्यांना कोणाच्या आदेशावरून बोलावण्यात आलं नाही? हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून होत आहे? असा सवाल आमदार लोबिन हेम्ब्रम यांनी उपस्थित केला आहे. तर तुम्हीही आम्हाला सांगितलं नाही. यासाठी आधी विभागाकडून मंजुरी घेऊ, त्यानंतरच पायाभरणीचे काम सुरू होईल, असे सांगितले आहे. सध्या या दोघांच्या हाणामारीच्या घटनेची चर्चा जोरदारपणे रंगली आहे.
लोबिन हेम्ब्रम हे सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार आहेत. बोरियो विधानसेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हेम्ब्रम यांनी गेल्या वर्षभरापासून आपल्याच सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या सुरक्षेमध्येही कपात करण्यात आली होती. त्यामुळे या आमदाराने स्वत:च्या सुरक्षेसाठी तिरंदाज नेमले होते.