Latest Marathi News
Ganesh J GIF

आपल्या पतीला आधार देत या फेमस अभिनेत्रीचे पडद्यावर कमबॅक

पतीला दिलेल्या साथीमुळे अभिनेत्रीवर काैतुक आणि टीकाही, पतीला आधार देत म्हणाली तू चाल पुढं तुला रं....

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- ड्रग्स क्रुझ प्रकरणात आर्यन खानला अडकवण्याच्या आरोपाखाली समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. त्याच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावरती आहे. याप्रकरणात सीबीआयने चौकशी सुरू करत आहे. दरम्यान सीबीआयने अटक करून नये असा दिलासा उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिला आहे. या दरम्यान त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर चर्चेत आल्या आहेत.

समीर वानखेडे हे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर प्रसिद्धी झोतात आले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप चर्चा झाली. या प्रकरणात क्रांती रेडकरने आपल्या नवऱ्याला खंबीर साथ दिली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ” समीर वानखेडे यांचे योद्धावाले स्पिरीट आमच्या सर्वांमध्ये उतरले आहे. त्यामुळे कितीही काही झाले तरी लढत राहायचे. कितीही आरोप झाले तरी लढत राहायचे आहे. या आधीही दीड वर्षापूर्वी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी समीर वानखेडे विजयी झाले होते. कितीही केसेस होऊ द्या आणि सत्य आमच्या पाठीशी आहे. मी समीरला नेहमी म्हणते. तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची. पर्वा बी कुणाची असे रेडकर यांनी आत्मविश्वासाने सांगितले आहे. दरम्यान क्रांती रेडकर लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. मराठी लावणी रिऍलिटी शो ढोलकीच्या तालावर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्री क्रांती रेडकर जजच्या भूमिकेत दिसणार आहे. कुठेतरी नृत्य ही माझ्या हृदयाच्या खूप जवळची अशी गोष्ट आहे. त्यामुळे मी जरी परीक्षकाच्या भूमिकेत असले तरीदेखील मी त्यांची सपोर्टर असेन असे क्रांती म्हणाली आहे.

क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. क्रांती रेडकर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. क्रांतीचे जत्रा, खो खो, शिक्षणाच्या आईचा घो हे चित्रपट प्रचंड गाजले. ती एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे. पण सध्या ती आपल्या पतीला साथ देताना दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!