Latest Marathi News
Ganesh J GIF

दुबईहून येताना या अभिनेत्रीला या कारणामुळे विमानतळावरच अडवले

अभिनेत्री होती खुपच घाबरलेली, म्हणाली आता वाट लागणार अशी भीती होती पण..

मुंबई दि १४(प्रतिनिधी) – सोशल मिडीयावर आपल्या छाप्यामुळे चर्चेत आलेले समीर वानखेडे आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर पती पत्नी आहेत. क्रांती रेडकरने २०१७ मध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केले. क्रांती नेहमीच नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. अगदी आर्यन खान प्रकरणात वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यावेळी देखील ती खंबीरपणे पतीला साथ देत होती. यावेळी तिने आपल्या भेटीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव आणि तिचा नवरा आरजे अनमोल यांच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या कार्यक्रमात क्रांती आणि समीर वानखेडे सहभागी झाले होते. यावेळी या दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. विशेष म्हणजे क्रांती आणि समीर रुईया कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होते. क्रांती म्हणाली, २०१० साली मी दुबईहून परत मुंबईला येत होते. एका पुरस्कार सोहळ्यासाठी मी तिकडे गेले होते. येताना माझ्या मित्रांनी माझ्याकडे दोन मद्याच्या बाटल्या दिल्या होत्या. मला प्रचंड भीती असते अशा काही गोष्टी आणताना पण, माझ्याकडे रितसर परवानगी होती. विमानतळावर सर्वत्र चेकिंग सुरु होती. त्याठिकाणी समीर वानखेडे मुख्य अधिकारी होते आणि त्यांनी मला इकडे ये अशी हाक मारली. मी प्रचंड घाबरले. त्यांनी मला समोरुन विचारलं, ‘तू मला ओळखलंस का?’ मी त्यांना म्हणाले, नाही.त्यानंतर ते हसले आणि मला त्यांचं कॉलेजमधील हास्य माहित होतं मी पटकन ओळखलं.त्यानंतर आमचं थोडावेळ बोलणं झालं. काहीवेळाने आम्ही एकमेकांचे नंबर घेतले. आणि नंतर पुन्हा ते संपर्कात आले. आणि अखेर २०१७ साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज या जोडप्याला झिया आणि जायदा नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती या दोघींचा चेहरा न दाखवता त्यांचे अनेक व्हिडीओ आणि किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते.

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे त्यांचं नाव प्रसिद्धीझोतात आलं. त्यानंतर ते सातत्याने चर्चेत राहिले. लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मात्र क्रांती सुरुवातीपासूनच पतीच्या मागे खंबीरपणे उभी आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!