Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटातील आमदार भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार?

एकनाथ शिंदे अपात्र ठरण्याची शिंदे गटातील आमदारांना भीती?, शिंदे गटातील आमदार अस्वस्थ?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे. जेंव्हा पासून अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. तेंव्हापासून अजित पवारच मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे अपात्र होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जर शिंदेसह इतर आमदार अपात्र ठरल्यास शिवसेना पक्षदेखील शिंदे गटाच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिंदे गटात अस्वस्था वाढली असून वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमदार किशोर पाटील म्हणाले की, “आमचा पक्ष अधिकृत शिवसेना आहे, निवडणूक आयोगानं आम्हाला चिन्हही दिले आहे. त्यामुळे आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच लढणार आहोत. परंतु जर काही तांत्रिक अडचण आली आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला तर आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत,असे किशोर पाटील म्हणाले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांना अपात्रतेची कारवाई ही होणारच नाही. ते अपात्र होणार नाहीत, अशी एक हजार एक टक्के शक्यता आणि मला विश्वास आहे. मात्र अपात्र झाल्यास एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, घरी बसा तर आम्ही घरी बसू, त्यांनी सांगितलं की, निवडणूक अपक्ष लढवा तर अपक्ष लढवू. आणि आम्ही नक्की विजयी होऊ असे देखील पाटील म्हणाले आहेत. आज राज्यात भाजप,शिंदे गट आणि अजित पवार गट यांची सत्ता आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही २०० पेक्षा अधिक जागा मिळविणारच आहोत, हेच खरे वास्तव आहे, असे मतही आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चेने शिंदे गटातील आमदारांची चलबिचल वाढली आहे. कारण शिंदे अपात्र ठरल्यास शिवसेना पक्ष पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपली आमदारकी वाचवण्यासाठी भाजपासोबत जाण्याचा मानस काही आमदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काळात आणखी राजकीय उलाढाल होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!