कर्नाटकात भाजपाला दणका देत काँग्रेसची सत्ता?
राहुलची सहानुभूती मोदी लाटेला नमवणार, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर
बेंगलोर दि ३०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्याचबरोबर निवडणूकीचे ओपीनियन पोल जाहीर झाले आहेत. पण हे अंदाज भाजपाची चिंता वाढवणारे आहेत. तर काँग्रेस लवकरच दक्षिणेतील एक राज्य जिंकण्याची शक्यता आहे.
विविध संस्थानी केलेले ओपीनियन पोल जाहीर झाले आहेत. एबीपी न्यूज’ आणि ‘सी व्होटर’ने केलेल्या सर्वेत काँग्रेसला ११५ ते १२७ जागा मिळू शकतात. भाजपाला ६८ ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जनता दल (सेक्युलर) या पक्षाचे २३ ते ३५ उमेदवार निवडून येऊ शकतात. एकंदरीत काँग्रेस स्वबळावर सत्ता मिळवण्याची शक्यता आहे. मेटेरोइज पोलनुसार, कर्नाटकात काँग्रेसला ८८ ते ९८ जागा, भाजपाला ९६ ते १०६ आणि जेडीएसला २३ ते ३३ जागा मिळू शकतात. पॉप्युलर पोल्सच्या सर्व्हेत काँग्रेसला ८२ ते ८७ जागा मिळताना दिसत आहेत. भाजपाला ८२ ते ८७ आणि जेडीएसला ४२ ते ४५ जागा मिळू शकतात. लोक पोलच्या सर्व्हेत काँग्रेसला ११६ ते १२३, भाजपाला ७७ ते १२३ आणि जेडीएसला २१ ते २७ जागा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटक पोल्सच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला १०० ते १०८ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला ८१ ते ८९ आणि जेडीएसला २७ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. आता काँग्रेसला सहानुभूती मिळते की मोदी लाट कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
भाजप आणि काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, राज्यात २२४ मतदारसंघांत १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.