Just another WordPress site

कसब्यात काँग्रेस ३२ वर्षानंतर इतिहास घडवणार?

कसबा पोटनिवडणुकीचा इतिहास काँग्रेसकडे, की भाजपा गड राखणार

पुणे दि ८(प्रतिनिधी)- भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेला जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपाकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे. धंगेकर तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे काँग्रेसला ३२ वर्षानंतर इतिहास घडवण्याची संधी मिळाली आहे. कारण इतिहास काँग्रेसच्या बाजूने आहे.

कसबा विधानसभा मतदार संघात १९९५ पासून भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पण २०१९ साली बापट यांनी खासदारकीची निवडणूक लढत जिंकल्यामुळे भाजपाने मुक्ता टिळक यांना संधी दिली होती. पण त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. आणि याआधीच्या एका पोटनिवडणूकीत काँग्रेसने भाजपाचा पराभव केला होता. कसबा विधानसभा मतदार संघात सन १९९१ मध्ये अण्णा जोशी विजयी झाले होते. पण पुढे ते खासदार झाल्यामुळे भाजपाने तत्कालीन नगरसेवक गिरिश बापट यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसकडून माजी महापौर वसंतराव थोरात उभे होते. त्यावेळी थोरात यांनी बापट यांचा पराभव केला होता. त्यावेळी भाजपतील ५ नगरसेवक बंड करत भाजपात गेले होते. त्यामुळे भाजपाचा पराभव झाला होता.

GIF Advt

रवींद्र धंगेकर यांनी कसब्यात एकहाती वर्चस्व राखून असलेल्या बापटांना चांगलाच घाम फोडला आहे.मागील दोन निवडणूकीत धंगेकर अगदी थोड्या मताने पराभूत झाले होते. त्यामुळे धंगेकराञसमोर रासने नवखे आहेत. जर काँग्रेसने नियोजनपुर्वक प्रचार केला तर काँग्रेसला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. पण भाजपा सहजसहजी मतदारसंघ सोडणार नाही हे ही तितकेच खरे आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!