Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री शिंदेच्या ‘या’ सभेतही खुर्च्या रिकाम्याच, व्हिडिओ व्हायरल

'कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेता म्हणत' या नेत्याने शिंदेना डिवचले

मुंबई दि ८(प्रतिनिधी) – शिवसेनेतील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात ठाकरे विरूद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. रोजच एकमेकांवर टिका केली जात असते. आता तर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना वरळीतुन लढण्याचे आव्हान दिले होते. त्याला उत्तर म्हणून शिंदे गटाने वरळीत सभा घेत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण एका व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेची सभा फेल झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात होते. या दोघांचा कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेला कमी गर्दी झाली होती. अनेक लोक सभेतून निघून जाताना दिसत होते. सभेनंतर या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सभेचा एक व्हीडिओ शेअर करत शिंदे गट व भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ट्विट करत  “मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. @वरळी कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला.. कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय.. ३२ वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?” असे म्हणत शिंदे गटाला डिवचले आहे. या सभेतही शिंदेनी सहा महिन्यापुर्वीचाच दाखला दिला आहे.

माझ्याविरोधात वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना मी छोटी आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी-मोठी आव्हानं स्वीकारतो. मी असेच मोठे आव्हान सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिउत्तर दिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!